केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चारजण जखमी
देश बातमी

केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चारजण जखमी

भुवनेश्वर : केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बालेश्वर जिल्ह्यातील निलगिरी येथील पोडासुला चक येथे हा अपघात झाला आहे. रविवारी हा अपघात घडला. ट्रॅक्टरची धडक झाल्याने केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांना किरकोळ जखम झाली असून अन्य चारजण जखमी झाले आहेत. गाडीत त्यांच्यासोबत त्यांचे पीए, पीएसओ आणि ड्रायव्हर यांनाही किरकोळ जखम झाली आहे. […]