केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चारजण जखमी
देश बातमी

केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चारजण जखमी

भुवनेश्वर : केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बालेश्वर जिल्ह्यातील निलगिरी येथील पोडासुला चक येथे हा अपघात झाला आहे. रविवारी हा अपघात घडला. ट्रॅक्टरची धडक झाल्याने केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांना किरकोळ जखम झाली असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गाडीत त्यांच्यासोबत त्यांचे पीए, पीएसओ आणि ड्रायव्हर यांनाही किरकोळ जखम झाली आहे. अपघातानंतर तातडीने सर्वांना निलगिरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, प्रताप सांरगी अत्यंत साध्या राहणीमानासाठीदेखील ओळखले जातात. ते सर्वसाधारणपणे प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. सारंगी आपल्या पेन्शनची रक्कम गरीबांमध्ये दान करतात. 64 वर्षीय प्रताप सारंगी यांनी कधी काळी साधु होण्याचा प्रयत्नही केला होता. ते एकांतात जीवन घालवू इच्छित होते, मात्र त्यांचं समाजाप्रती समर्पण आणि जनसेवेचा भाव पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात आणलं आहे, असे सांगितले जाते.