बीडच्या वाघाची राष्ट्रीय विक्रमाला गवसणी; अविनाश साबळेला सुवर्ण
क्रीडा

बीडच्या वाघाची राष्ट्रीय विक्रमाला गवसणी; अविनाश साबळेला सुवर्ण

पातियाळा : पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील बीडच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली, तर कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. २६ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २०.२० सेकंद अशी वेळ नोंदवताना २०१९मधील स्वत:चाच ८ मि. २१.३७ से. वेळेचा विक्रम मोडीत काढला. […]