पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले; भाविना पटेलला मिळाले रौप्यपद
क्रीडा

पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले; भाविना पटेलला मिळाले रौप्यपद

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने भारतासाठी पहिले पदक आणले आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. […]