भाजपचा समान नागरी कायद्याचा गजर, गुजरातमध्ये आश्वासन; कर्नाटकचीही चाचपणी
राजकारण

भाजपचा समान नागरी कायद्याचा गजर, गुजरातमध्ये आश्वासन; कर्नाटकचीही चाचपणी

भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याचा गजर केला. गुजरात विधानसभा निवडणुकीतील जाहीरनामा भाजपने शनिवारी प्रसिद्ध केला. यात सत्ता आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे; तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही, ‘आपले सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे,’ असे […]