मुंबई : आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजेचय १० मार्च १८९७ला झाला. याच निमित्ताने दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. त्यांचा हा चित्रपट क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करत केली […]