मोठ्या पडद्यावर झळकणार फुले दाम्पत्यांचा जीवनप्रवास; पाहा टीझर
मनोरंजन

मोठ्या पडद्यावर झळकणार फुले दाम्पत्यांचा जीवनप्रवास; पाहा टीझर

मुंबई : आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजेचय १० मार्च १८९७ला झाला. याच निमित्ताने दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. त्यांचा हा चित्रपट क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करत केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/OffiChatarPatar/status/1369594442781442049

समीरने सोशल मीडियावरून टीझर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव महात्मा आहे. या टीझरला काही वेळातच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या टीझरमध्ये विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। हे महात्मा ज्योतिराव फुले यांची वाक्य दाखवण्यात आली आहेत. एका महान जोडप्याची कथा असे वाक्य आल्यानंतर चित्रपटाचे नाव येते महात्मा महात्म्यांची महान गाथा असे ते म्हणाले आहे. तर या टीझरला शेअर करत क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. सावीत्रीबाईंच्या स्मृतीस वंदन करून सांगू पाहतोय. अन्यायाविरूद्धच्या अभूतपूर्व लढ्याची कथा! असे कॅप्शन समीर विध्वंसने दिले आहे.

या चित्रपटाचे दोन भाग असणार आहे. पहिला क्रांतीसूर्य- १ दुसरा क्रांतीज्योती -२ असे या दोन भागांचे नाव आहे. या चित्रपटाचे निर्माता अनिश जोग आणि रणजित गुगळे यांनी केले आहे. तर अजय-अतुल याला संगीत देणार आहेत. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.