गुगल डाऊन झाल्याने संतापले नेटीझन्स; ट्विटरवर मिम्सचा धुमाकूळ
टेक इट EASY

गुगल डाऊन झाल्याने संतापले नेटीझन्स; ट्विटरवर मिम्सचा धुमाकूळ

नवी दिल्ली : लोकप्रिय सर्च इंजिन गुगल हे काही कारणांनी डाऊन झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे नेटीझन्सचा संताप अनावर झाला असून ट्विटरवर याबाबत मिम्स व्हायरल होत आहेत. जगभरातील कोट्यवधी युजर्सनी गुगल डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. गुगल डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनेक युजर्सना दुपारच्या सुमारास ही समस्या जाणवत होती. दरम्यान यावर आणखी गुगलकडून कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नसून अनेक देशांमध्ये #GoogleDown हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

अनेकांनी गुगलचा मजाक उडविणारे ट्विट मोठ्या प्रमाणावर केले आहेत. याबाबत एका युजरने ट्वीट करताना गुगलचा स्क्रीनशॉट शेअर करत गुगला काय झाले हे माहित नाही असे म्हटले आहे. या युजरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये 400 एरर आल्याचे दिसत आहे.

https://twitter.com/ImKeshav3/status/1338459220434284549