उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
बातमी मुंबई

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला मुंबई महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित करण्यात आला आहे. ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकवली असल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचं समोर आलं आहे.

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर) यांचाही समावेश आहे. दरम्यान सर्वसामान्यांप्रमाणे मंत्री आणि राजकीय नेत्यांवरही कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी