धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या
देश बातमी

धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

बंगळुरु : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना कर्नाटकमधील यादगीरमध्ये सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये आई-वडील, तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. शेतात पिक घेण्यास अपयश आल्याने कर्ज कसं भरणार? असा प्रश्न या कुटुंबाला पडला होता. अखेर शेततळ्यात उडी घेऊन कुटुंबाने आपलं जीवन कायमचं संपवल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेनंतर पोलिसांनी तलावातून सहा जणांचे मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. भीमराव सुरापुरा, त्यांची पत्नी शांतम्मा, मुलगा शिवराज आणि मुली सुमित्रा, श्रीदेवी, लक्ष्मी अशी त्यांची नावं आहे. मात्र त्यांच्यापैकी काही जणांचे मृतदेह वर तरंगताना नागरिकांनी पाहिल्यानंतर घटनेची माहिती मिळाली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सहा जणांनी यादगीरमधील तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी त्यांच्या शेतात फळबाग फुलवली होती. मात्र त्यांना त्यात यश न आल्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.