राजकारण

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच केंद्र सरकारचा मुकुल रॉय यांच्याबाबत मोठा निर्णय

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुलगा शुभ्रांशू रॉय याच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच केंद्र सरकारने त्यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. मुकुल रॉय यांच्या घरवापसीमुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. अशात गृह मंत्रालयाकडून मुकुल रॉय यांची सुरक्षा देखील काढण्यात आली आहे. विशेष […]

बातमी मुंबई

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक; काय आहे प्रकरण?

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. यासंदर्भात एनआयएनं प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला होता. […]

क्रीडा वायरल झालं जी

गल्ली क्रिकेटमधल्या पोरांसारखी पाकिस्तानी खेळाडूंची मैदानात भांडणं; व्हिडिओ व्हायरल

अबूधाबी : पीएसएलमध्ये पाकिस्तानच्या दोन क्रिकेटपटूंनी मैदानातच एकमेकांशी पंगा घेतला असून या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी आणि माजी कर्णधार सरफराज अहमद या दोघांचं पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्स यांच्यातल्या सामन्यात भांडण झालं. ग्लॅडिएटर्सची बॅटिंग सुरू असताना 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली जेव्हा शाहीन आफ्रिदीने सरफराजला […]

काम-धंदा

सोन्याच्या दरात घसरण; महिनाभरातील निचांकी दराची नोंद

नवी दिल्ली : सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. विदेशी बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 36 रुपयांच्या किरकोळ तेजीमुळे 48,460 रुपये प्रति तोळा झाली आहे. दरम्यान चांदीची वायदे किंमत 227 रुपयांनी अर्थात 0.32 टक्क्याच्या तेजीमुळे 71,475 रुपये प्रति किलो […]

मनोरंजन

रामायण’ फेम अभिनेत्याचे ९८व्या वर्षी निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं आज (ता. १६) निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जातं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी मुंबईतील अंधेरीच्या आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांना आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या कुटुंबांसोबत राहायचं होतं […]

देश बातमी

मोठी बातमी : वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन यांची पोलिसांकडून चौकशी

कोलकाता : भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची आज त्यांच्या वाढदिवसादिवशीच पश्चिम बंगाल पोलिसांनी चौकशी केली आहे. मिथुन यांची ऑनलाईन चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर ७ मार्च रोजी पक्षात सामील झाल्यानंतर वादग्रस्त भाषण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, हे भाषणच बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर जो हिंसाचार झाला, […]

बातमी महाराष्ट्र

कोल्हापूरातील मराठा आंदोलनानंर संभाजीराजेंचा मोठा निर्णय

कोल्हापूर : मराठा आरक्षणावर कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात कोल्हापूरात मूक आंदोलन पार पडलं. या आंदोलनात समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत मनोगत व्यक्त केलं. दरम्यान, या मूक आंदोलनानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री […]

देश बातमी

आयुष्मान भारत योजना फेल; युपीमध्ये ८७५ तर बिहारमध्ये केवळ १९रुग्णांवर उपचार

नवी दिल्ली : केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना ही कोरोना काळात सपशेल अपयशी ठरली असल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात देशातल्या आरोग्य यंत्रणांबद्दलची सत्य परिस्थिती समोर आली. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधं यांच्या अभावाने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. आजतक, इंडिया टुडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत केवळ १९ […]

देश बातमी

धक्कादायक ! ट्रकने कारला दिली धडक; एकाच कुटुंबातील १०जणांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंब प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला धडक होऊन हा अपघात झाला. हे कुटुंब सूरत येथून भावनगरसाठी निघालं होतं. यावेळी इंद्रनज गावाजवळ त्यांच्या कार आणि ट्रकमध्ये धडक होऊन अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला, […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ६२२२४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; तर एवढ्या जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यू संख्या कमी झालेली नाही. देशात गेल्या २४ तासात ६२,२२४ नवीन कोरोना बाधित रुग्ण […]