घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी
राजकारण

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी

पुणे : देशात ६४ वर्षां नंतर ही लोकशाही मार्गाने आलेल्या भाजपच्या पंतप्रधानांनी, देशात घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाही रक्षण होणार नसल्याचे प्रतिपादन कोणत्या आधारे केले? असा सवाल राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला असून, घराणे शाहीचा जन्म पती_पत्नीच्या नात्यातून होतो व त्यास ऊत्तरदायीत्वाचे व जबाबदारीचे बंधन असल्याचे म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिवारी म्हणाले, ‘आजतागायत देशांतील विविध राष्ट्रीय पक्षात असो वा विविध राज्यातील प्रादेशिक पक्षात असो, घराणेशाही ही लोकशाहीने अर्थात लोकांनीच जपली आहे. कारण त्यात लोकशाहीचा गाभा हाच जबाबदार ऊतितदाऱ्यीत्व आहे. त्यामुळेच देशात संविघानात्मक व धर्मनिरपेक्ष तत्वांची जपणूक होत आली आहे. सामाजिक सलोखा व विविधतेत एकता या मुल्यांचे प्रदर्शन भारतीय संस्कृतीमधून ऊभ्या देशात होत आले आहे व त्यामुळेच देशाची एकता, अखंडता कायम राखून देश २१व्या शतकासाठी आवश्यक विकास साधत आर्थिक महासत्तेच्या ऊंबरठ्यावर काँग्रेसप्रणित युपीएने आणून ठेवला होता’.

परंतु, लोकशाही प्रक्रियेत पुर्वीच्या सरकारांनी देशांतर्गत खुले ठेवलेले विचार-भाषण स्वातंत्र्याच्या आधारे पुर्वीच्या विरोधी पक्षांनी व सध्याच्या सत्तेतील भाजप ने विविधांगी आरोप करून व स्वप्ने दाखवून सत्ता हस्तगत केली. किमान हे तरी भाषणजीवी पंतप्रधान मोदी साहेब व त्यांच्या भाजपने लक्षात ठेवावे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्षांतर्गत कोणत्या लोकशाहीचे पालन आपण करत आहात हे देखील जनतेस सांगावे, असे आवाहन गोपाळ तिवारी यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्राद्वारे केले आहे.