नंदा खरे लिखित ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार
मनोरंजन

नंदा खरे लिखित ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई : लेखक नंदा खरे लिखित उद्या या कादंबरीला मराठीसाठी सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार-२०२० आज (ता. १२) जाहीर करण्यात आले. त्यामधे ही घोषणा करण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, आबाची गोष्ट या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

साहित्य अकादमीने आज (ता. १२) २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.