धक्कादायक ! अभिनय क्षेत्रात आत्महत्यांचे सत्र सुरूच; आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या
मनोरंजन

धक्कादायक ! अभिनय क्षेत्रात आत्महत्यांचे सत्र सुरूच; आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

मुंबई : अभिनय क्षेत्रात आत्महत्यांचे सत्र सुरुच असून आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्व हादरलं होतं. 2020 वर्षामध्ये मनोरंजन विश्वाने अनेक तारे गमावले. आज पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता इंद्रकुमार याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक अपत्य असा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

19 फेब्रुवारी रोजी पेलांबलूर याठिकाणी ही घटना घडली आहे. मीडिया अहवालानुसार त्याने त्याच्या मित्राच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. याठिकाणी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे. बुधवारी तो मित्राबरोबर सिनेमा पाहण्यास देखील गेला होता, त्यानंतर परतल्यानंतर तो एका मित्राकडेच होता. मित्रांनाच त्याचा मृतदेह सापडला होता, पोलिसांना देखील त्यांनी माहिती दिली. सदर प्रकरणाचा तपास सुरू असून सुसाइड नोट न सापडल्यामुळे सर्व अँगलनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अद्याप इंद्रकुमार याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत ठोस माहिती समोर आली नाही आहे. तो एक स्ट्रगलिंग अॅक्टर होता. अभिनय क्षेत्रात तो स्वत:ची ओळख निर्माण करू पाहत होता. पण तेवढ्यात त्याने असा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. इंद्रकुमार श्रीलंकन रेफ्यूजी होता असून तो एका तमिळ मालिकेचा भाग होता.