RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप
देश बातमी

RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप

२००४ च्या लोकसभा निवडणुकांआधी देशभरामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट होता असा धक्कादायक दावा संघटनेमध्ये प्रचार म्हणून काम करणाऱ्या यशवंत शिंदे यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये १९९५ सालापासून प्रचारक म्हणून काम करणाऱ्या शिंदेंचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने देशाविरोधात कट रचणाऱ्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या यशवंत शिंदे यांनी दिलेल्या कबुली जबाबामध्ये संघाच्या देशविरोधी कारवायांसंदर्भात धक्कादायक माहितीवर प्रकाश टाकला आहे. संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, त्यामध्ये कोणकोण सहभागी आहे याहून मोठी ब्रेकिंग न्यूज काय असू शकते?” असा प्रश्न विचारत पवन खेरा यांनी यशवंत शिंदेंचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरुन हाच व्हिडीओ कोट करुन रिट्विट करताना, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक यशवंत शिंदे यांनी संघाकडून केल्या जाणाऱ्या देशाविरोधातील कारवायांबद्दल केलेल्या दाव्यांची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. निवडणूका जिंकण्यासाठी देशाविरोधात कट रचणारे राष्ट्रवादी नसतात. या कटातील प्रत्येक व्यक्तीविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे