#जागतिकएड्सदिन : एड्स आणि एचआयव्ही; समज-गैरसमज आणि बरच काही
देश बातमी

#जागतिकएड्सदिन : एड्स आणि एचआयव्ही; समज-गैरसमज आणि बरच काही

जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. एचआयव्हीचा संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या रोगामुळे आतापर्यंत 3.5 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एड्स म्हणजे काय?
एड्स म्हणजे ‘अक्वायर्ड इम्युनोडिफीशियन्सी सिंड्रोम’. यातील ‘अक्वायर्ड’ म्हणजे जन्मजात नसलेली पण नंतर प्राप्त झालेली तर ‘डेफिसीएन्सी’ म्हणजे प्रतिकार यंत्रणेतील कमतरचा किंवा उणीव. तर ‘सिंड्रोम’ म्हणजे एकाच रोगामुळे जे आजार व लक्षणे आढळून येतात.

  • एड्स दिनाची सुरूवात

ऑगस्ट 1983 मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर 1 डिसेंबर 1988 पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. ‘जागतिक एड्स दिन’ प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये 1988 मध्ये साजरा केला.

एड्स कसा पसरतो ?
एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.

  • भारतातील एड्सची आकडेवारी

मागील काही महिन्यांपासून एचआयव्ही रुग्णांचा घटता आलेख दिसून येत आहे. एप्रिल 2015 ते मार्च 2020 पर्यंत 41 टक्के रुग्णसंख्या घटली असल्याचे समोर आले आहे. तर मुंबईमध्ये 2015-16 मध्ये 2.8 लाख लोकांची एचआयव्ही स्क्रीनिंग झाली. यात वर्ष 2019- 2020 मध्ये चाचणीचा आकडा दुप्पट झाला. हा आकडा 4.8 लाखावर पोहोचला. तसेच मागील पाच वर्षात नवीन रुग्णांची संख्या घटली असून ही संख्या 7, 592 होती तर 4473 एवढी झाली आहे. सध्या 36, 580 लोक एचआयव्ही रुग्ण आहेत. महिला सेक्स वर्कर(एफएसडब्ल्यू) आणि एमएसएम संबंध आणि तृतीयपंथी मधील एचआयव्ही संक्रमणाचा धोका अधिक असतो.

  •   एड्स : समज आणि गैरसमज
    एचआयव्ही ची लागण हे एड्सचं सर्वात मोठं कारण आहे. या विषाणूची बाधा झालेले एकूण 3.7 कोटी लोक जगभरात आहे. त्यापैकी 70% लोक एकट्या आफ्रिका खंडात आहे. एड्स हा रोग 1980च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. एचआयव्हीची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक समज आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतंय.

समज 1 –
एचआयव्ही बाधित लोकांच्या संपर्कात आल्यास
एचआयव्ही बाधित लोकांच्या संपर्कात आल्याने, त्यांना स्पर्श केल्याने किंवा त्यांच्या लाळेतून एचआयव्ही चा संसर्ग होतो, असा गैरसमज आजही लोकांमध्ये आहे. यामुळे अशा लोकांशी समाजात खूप भेदभाव केला जातो.

  •   खरं काय?

एचआयव्ही बाधित लोकांच्या संपर्कात आल्याने, त्यांना स्पर्श केल्याने, तसेच त्यांच्या अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे एचआयव्ही पसरत नाही. त्याचबरोबर, एकाच हवेत श्वास घेणं, हात मिळवणं, मिठी किंवा चुंबन घेणं, एकाच भांड्यात खाणं-पिणं, पाण्याचा समान स्रोत वापरणं (उदा. अंघोळीचं पाणी, शॉवर), खासगी वस्तू शेअर करणं, जिममध्ये व्यायामाची समान साधनं वापरणं, टॉयलेट सीटला, दरवाजाच्या कडीला स्पर्श करणं, यामुळेही एचआयव्हीचा संसर्ग होत नाही.
यामुळे होतो एचआयव्ही चा संसर्ग

HIV बाधित व्यक्तीचं रक्त, वीर्य, योनीतील स्राव किंवा अंगावरचं दूध निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेलं तरच हा रोग पसरण्याची शक्यता असते.

समज 2 –

डासांमुळे एचआयव्हीचा संसर्ग
डासांच्या चावण्याने किंवा रक्तपिपासू कीटकांद्वारे (उदा. डास) एचआयव्ही पसरत नाही. रक्तामुळे एचआयव्ही पसरतो हे जरी खरं असलं तरी रक्तपिपासू कीटकांद्वारे (उदा. डास) एचआयव्ही पसरत नाही, संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे . त्यामुळे एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात डास असतील आणि HIVचा प्रादुर्भाव असेल तरी या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही.
कारण, १) HIVचा विषाणू त्यांच्या शरीरात अल्पकाळ टिकतो.
कारण २) जेव्हा कीटक चावतात तेव्हा त्यांनी आधी चावा घेतलेल्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीत सोडत नाहीत.

समज 3 –

अघोरी प्रकारांमुळे एचआयव्ही बरा होतो
अघोरी प्रथा, पूजा, बळी, पर्यायी औषधं, सेक्स केल्यानंतर अंघोळ करणं, किंवा कुमारिका मुलीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करणं, यथील कोणत्याही प्रकाराने एचआयव्ही बरा होत नाही. निम-वाळवंटी आफ्रिका, भारतातला काही भाग आणि थायलंडमध्ये कुमारिका मुलींबरोबर सेक्स करणं हा गैरसमज प्रचलित आहे. मात्र तो अतिशय धोकादायक आहे. यामुळे या भागात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर लहान बालकांवरही बलात्कार होतो आणि पर्यायाने त्या लहान त्यांनाही HIVचा धोका बळावतो.

समज 4 –

कंडोम वापरल्यास एचआयव्हीची लागण होत नाही
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चारपैकी एका जणाला, म्हणजे तब्बल 94 लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याची माहिती नसते. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे. कंडोम वापरल्याने एचआयव्हीची लागण होत नाही, असा गैरसमज आहे. पण आपण जर एचआयव्ही बाधित व्यक्तीसोबत सेक्स करत असाल आणि सेक्स करतेवेळी कंडोम फाटला, निघाला किंवा लीक झाला तर HIVची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे एड्सबाबत जे जनजागृती अभियान राबविणारे किंवा तज्ञ लॅटेक्स शीथ म्हणजेच जाड कंडोम घालण्याचा सल्ला तर देतात. त्याचबरोबर HIVची चाचणी करण्याचाही सल्ला देतात. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ताबडतोब उपचार घेण्याचा सल्ला देतात.

समज  5 –

मुखमैथुनाद्वारे एचआयव्ही होतो का ?
एचआयव्ही बाधित व्यक्तीसोबत ओरल सेक्स केला तर एचआयव्हीची लागण होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ओरल सेक्सच्या वेळीही कंडोम वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र सेक्सच्या इतर प्रकारांपेक्षा ओरल सेक्स म्हणजेच मुखमैथून बऱ्यापैकी सुरक्षित आहे. तसेच, 10,000 पैकी फक्त 4 केसेसमध्येच एड्स ओरल सेक्सद्वारे पसरतो, असं संशोधनातून आढळून आले आहे.

समज 6  –

एचआयव्ही झाल्यास लवकर मृत्यू होतो
संयुक्त राष्ट्रांच्या मते 47% लोकांच्या रक्तात एचआयव्हीचं प्रमाण इतकं कमी आहे की रक्तचाचण्यांमध्ये हे विषाणू दिसतही नाहीत. ज्या लोकांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्या लोकांकडून हे विषाणू दुसऱ्यांपर्यंत पसरतही नाहीत. तसेच, जे एचआयव्ही बाधित योग्य उपचार, आहार आणि स्वतःची काळजी घेत आहेत, ते चांगलं आयुष्य जगत आहेत. मात्र त्यांनी जर उपचार घेणं थांबवलं तर HIV पुन्हा रक्तात सापडू शकतो.

समज 7 – 

आई एचआयव्ही बाधित असेल तर मुलांनाही होतोच
हे अगदीच सत्य नाही. ज्या मातांमध्ये हा विषाणू अगदी नगण्य प्रमाणात असतो, त्या माता निरोगी बालकाला जन्म देऊ शकतात.

  • एचआयव्हीपासून बचाव कसा कराल?
    एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.