अखेर पाकिस्तान सरकार झुकले, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार पाक क्रिकेट संघ
क्रीडा

अखेर पाकिस्तान सरकार झुकले, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार पाक क्रिकेट संघ

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान राजकीय संबंध चांगले नसल्याने दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. भारत आणि पाक या दोन क्रिकेट संघांचा आमना-सामना केवळ आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्येच होत असतो. इतकेच नाही तर हे दोन संघ भारत-पाकिस्तान दौरे देखील करत नाहीत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याच कारणामुळे आशिया चषक २०२३ चे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद सांभाळणार आहे. मात्र, टीम इंडियाने सुरक्षेच्या कारणांसाठी पाकिस्तानाला जाण्यास नकार दिला. भारतीय संघ आपले सामने श्रीलंकेत खेळेल. अंतिम सामना देखील श्रीलंकेतच होईल.

भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी भारतात येण्याबाबत कठोर भूमिका घेतली होती. सरकारने अनुमती दिल्यानंतर पाकिस्तानचा संघाला भारतात पाठवले जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. शहबाज शरीफ सरकारने गेल्या राही दिवसांपूर्वी यासाठीच एक समिती स्थापन केली होती. तथापि, आता पाक सरकारला आता भारतापुढे झुकावे लागले.