भारताचं आणखी एक मेडल पक्कं! रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश
क्रीडा

भारताचं आणखी एक मेडल पक्कं! रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली असून आज भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. […]

कौतुकास्पद ! कुस्तीपटू रवी दहिया, दीपक पूनिया उपांत्य फेरीत
क्रीडा

कौतुकास्पद ! कुस्तीपटू रवी दहिया, दीपक पूनिया उपांत्य फेरीत

टोकियो : भारतीय कुस्तीपटू रवी दहिया आणि दीपक पूनिया यांनी उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. दोघांनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चुरशीच्या सामन्यामध्ये विजय मिळवत कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवण्याचा आशा पल्लवित केल्या आहेत. दीपकने अगदी शेवटच्या सेकंदामध्ये आपल्या चीन प्रतिस्पर्धकाला धोबीपछाड देत सामना जिंकला. ५७ किलो वजनी गटामध्ये रवी दहियाने बुल्गेरियाच्या वॅलिंटिनोवचा १४-४ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीलाच […]

कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं; सुशिलकुमारनंतर आणखी एका सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक
क्रीडा

कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं; सुशिलकुमारनंतर आणखी एका सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक

नवी दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारच्या अटकेनंतर सध्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील माजी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू मनजितला दरोडा आणि अवैध दारुच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. द्वारकाचे डीसीपी संतोषकुमार मीना यांनी सांगितले, की विशेष पथकाने कौशल गँगचा सक्रिय सदस्य मनजित याला २४ मे रोजी […]

विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक; क्रमांक एकवर विराजमान
क्रीडा

विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक; क्रमांक एकवर विराजमान

नवी दिल्ली : भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मट्टे पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग आठवड्यांमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवत क्रमांक एकवर विराजमान झाली आहे. विनेशने ५३ किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला ४-० ने हरवले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी २६ वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय […]