विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक; क्रमांक एकवर विराजमान
क्रीडा

विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक; क्रमांक एकवर विराजमान

नवी दिल्ली : भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मट्टे पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग आठवड्यांमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवत क्रमांक एकवर विराजमान झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विनेशने ५३ किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला ४-० ने हरवले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी २६ वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

गेल्या आठवड्यात विनेशने किवमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. स्पर्धेत प्रवेश करताना तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या विनेशने १४ गुणांची कमाई करत जागतिक क्रमवारीत आपले प्रथम स्थान परत मिळवले. विनेशने या स्पर्धेत एकही गुण गमावला नाही. शनिवारी सरिता मोरने ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते.