द डर्टी पिक्चरच्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता
मनोरंजन

द डर्टी पिक्चरच्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता

कोलकाता : द डर्टी पिक्चर आणि लव्ह सेक्स धोका या चित्रपटात भूमिका साकारलेली बंगाली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला. कोलकातामधील जोधपूर पार्क इथल्या तिच्या निवासस्थानी देवदत्त मृतावस्थेत आढळली. अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावलं. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. […]