भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार जाहीर
देश बातमी

भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार जाहीर

भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना गणितातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. त्यांना अन्य दोन विजेत्यांसह संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पदक आणि १ लाख डॉलर्स असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॅलिफोर्निया विद्यापीठ, वर्कलेचे निखिल श्रीवास्तव, इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी लॉसानंचे अॅडम मार्क्स आणि येल विद्यापीठाते डॅनिअल अॅलन स्पिलमॅन यांना २०२१ चा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायंसेजनं दिली. निखिल श्रीवास्तव हे गेल्या अनेक काळापासून कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफवर अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

निखिल श्रीवास्तव हे सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणिताचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. निखिल श्रीवास्तव, मार्क्स आणि स्पिलमॅन यांनी कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत गेल्या मोठ्या कालावधीपासून अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत. या प्रक्रियेत रेखीय बीजगणित, बहुपदी भूमिती आणि आलेख सिद्धांत यांच्यातील एक नवीन नव्या संबंधांचा शोध घेण्यात आला आहे.