मुंबई, दि. १६: महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी […]
Author: K Abhijeet
अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई उपनगर- शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अनुसूचित जातीतील मांग/ मातंग/मिनी,मादींग/दानखणी मांग/मांग महाशी/मदारी/राधेमांग/मांग गारुडी/ मांग गारोडी/ मदारी/मादगी या १२ पोटजातीतील समाजाच्या […]
शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन
मुंबई : राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन (स्टायफंड) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा […]
अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी
मुंबई, दि. ७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम […]
जनावरांच्या उष्माघाताची कारणे ; उन्हाळ्यात जनावरांची देखभाल कशी करावी?
राज्यासह अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होतो. सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे वातावरण बदलेले आहे.परंतु दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात उन्हामध्ये चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे […]
मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी
नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ऐन उन्हाळ्यात २० लाखांचा जनसमुदाय एकत्रित आणणे सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. रखरखत्या उन्हात खारघर येथील मैदानावर पाच तास बसावे लागल्यामुळे शेकडो श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवला. अखेर उष्माघाताचा त्रास सहन न झाल्याने ११ श्री सदस्यांचा नाहक बळी गेला आहे. तर नवी मुंबई पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात […]
कांद्याला कवडीमोल भाव; घरी नऊजण खाणारे, 25 वर्षीय शेतकऱ्याने उचललं नको ते पाऊल
शेतात पिकवलेल्या कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने हातात पैसे नाहीत, कुटुंबातील नऊ जणांची जबाबदारी, कर्ज कसे फेडायचे या संभ्रमात असलेल्या बीडच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा केली जात आहे. संभाजी अर्जुन अष्टेकर असे हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या शेतात गळफास घेतल्याचे आज उघडकीस आले आहे. संभाजी अष्टेकर यांच्यावर […]
काहीही करुन कसबा पोटनिवडणुकीत भाजपला विजय महत्त्वाचा का? ही चार कारणं वाचून क्रोनोलॉजी समजेल
गेल्या काही दिवसांपासून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही पहिलीच चुरशीची म्हणावी अशी विधानसभेची पोटनिवडणूक आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीसांना आपली ताकद दाखवून द्यायची आहे. विशेष करून भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपला नागपूर आणि अमरावतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. कसबा आणि चिंचवड […]
‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘मल्टी मीडिया ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे, यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गेट वे ऑफ इंडिया येथे […]
चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे २५० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२- २०२३ मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक ४ मधील १४ सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी १ मार्च २०२३ पर्यंत […]