बीएसएनएलन’चा २४९ रुपयांचा धांसू प्लान; केवळ ‘याच’ युजर्सना मिळणार लाभ
लाइफफंडा

बीएसएनएलन’चा २४९ रुपयांचा धांसू प्लान; केवळ ‘याच’ युजर्सना मिळणार लाभ

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) २४९ रुपयांचा प्लान आणला आहे. ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी आहे. जर तुम्हाला ही ऑफर हवी असेल तर लवकरात लवकर करा. बीएसएनएलच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग मध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि युजर्सला रोज २ जीबी डेटा मिळतो. या रिचार्ज प्लानमध्ये दोन महिन्याची म्हणजेच ६० दिवसांची वैधता मिळते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र या प्लानचा लाभ जे पहिल्यांदा बीएसएनएलचा उपयोग करीत आहेत. म्हणजेच हा कंपनीचा एफआरसी रिचार्ज आहे. याचा लाभ केवळ नवीन ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लान सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लानचा लाभ ३१ मार्च २०२१ पर्यंत घेतला जाऊ शकतो.

बीएसएनएलच्या या २४९ रुपयांच्या रिचार्ज केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत कोणताही रिचार्ज करण्याची गरज नाही. कारण, याची वैधता ० दिवसांची आहे. कमी किंमतीत दोन महिन्यांपर्यंत कॉलिंगची सुविधा असणाऱ्यांसाठी हा प्लान बेस्ट आहे. तसेच जे युजर्संना मोठी वैधतेसोबत कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये दोन महिन्यांपर्यंत व्हाइस कॉलिंग मिळते.