हॅपी बर्थडे श्रद्धा कपूर ! श्रद्धा माझ्यासाठी देवानं दिलेलं गिफ्ट; शक्ती कपूर यांनी केलं लेकीचं कौतुक
मनोरंजन

हॅपी बर्थडे श्रद्धा कपूर ! श्रद्धा माझ्यासाठी देवानं दिलेलं गिफ्ट; शक्ती कपूर यांनी केलं लेकीचं कौतुक

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आपला मावस भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नासाठी मालदिवमध्ये आहे. प्रियांक हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आहे. ३ मार्चला तिचा वाढदिवस आहे. त्यामुळे या वर्षीचा तिचा वाढदिवस मालदीवमध्येच साजरा करण्याचे कपूर कुटुंबीयांनी ठरवले आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील शक्ती कपूर यांनी खास शब्दात तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“यंदाचं सेलिब्रेशन खूप मोठं असणार आहे कारण यंदा आमचा पूर्ण परिवार एकत्र मालदिवमध्ये श्रद्धाचा वाढदिवस साजरा करणार आहोत. सगळे सोबत आहेत म्हटल्यावर मजा येईल.” तिच्याबद्दल बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, “श्रद्धा माणूस म्हणून खूप चांगली आहे. श्रद्धा माझ्यासाठी देवानं दिलेलं गिफ्ट आहे, ती जणू देवदूतच आहे. माझ्यात जे गुण नाहीत ते तिच्यात आहेत. तिला प्राणी खूप आवडतात. मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की आज ती एवढी यशस्वी अभिनेत्री आहे पण तरीही ती माझं ऐकते, माझं मत विचारात घेते, माझ्याशी कायम अदबीनं वागते. मला माझ्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नाही.”

लहानपणी ती शाळेतल्या नाटकांमध्ये भाग घ्यायची, तेव्हा मला वाटायचं खरं की ही अभिनेत्री होईल की काय…पण शाळेत ती खूप हुशार होती आणि नंतर ती जेव्हा शिक्षणासाठी अमेरिकेला गेली तेव्हा मला वाटलंच नव्हतं ती अभिनय क्षेत्रात येईल. पण अचानक एक दिवस मी शूटिंगवरून घरी आलो तेव्हा तिने मला सांगितलं की तिने एक चित्रपट स्वीकारला आहे.,” इतकेच नव्हे तर श्रद्धाने मला तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मी स्मोकिंग सोडावं, असं सांगितलं होतं.

दरम्यान चुलत भावाच्या लग्न सोहळ्यासाठी मालदीवला गेलेल्या श्रद्धा कपूरच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा तिच्या ‘स्त्री’ चित्रपटातील ‘कमरिया’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रावर श्रद्धाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धासोबत तिचा भाऊ सिद्धांत कपूर सुद्धा दिसत आहे.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘बागी ३’ चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान होते. श्रद्धा कपूर आता लव रंजन या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.