विवोचा Vivo Y51A हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच; ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

विवोचा Vivo Y51A हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच; ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी विवोने वाय सीरीज अंतर्गत Vivo Y51A हा आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा 5000mAh बॅटरी आणि १२८ जीबी स्टोरेज सारखी खास वैशिष्ट्येही आहेत.Vivo Y51A ला मेक इन इंडिया अंतर्गत विवोच्या ग्रेटर नोएडा येथील फॅक्टरीत बनविण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Vivo Y51A ची किंमत
या स्मार्टफोनला १७ हजार ९९० रुपयांत लाँच केले आहे. एचडीएफसी कार्ड सोबत फोन खरेदी केल्यास १ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. झीरो डाउन पेमेंट स्कीम अंतर्गत या फोनला कंपनीने लाँच केले आहे. विवोचा हा फोन टायटेनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिंफनी कलरमध्ये आहे. फोनला विवो इंडिया ई-स्टोर, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक आणि अन्य दुसऱ्या स्टोरवरून खरेदी करता येवू शकते.

Vivo Y51A चे खास फीचर्स
विवोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड फनटच ओएस ११ वर काम करतो. विवोच्या या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. फोनचा रिझॉल्यूशन (2408×1080 पिक्सल) आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम ६६२ प्रोसेसर दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज या फोनमध्ये दिला आहे. फोनमध्ये ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ओटीजी, यूएसबी टाइप-सी, ग्लोनास यासारखे फीचर्स आहेत.

तसेच स्मार्टफोन मध्ये एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, ई-कंपास, फिंगरप्रिंट सेंसर आणि जायरोस्कोप दिले आहेत. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. विवोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.