बीएसएनएलचा जबरदस्त प्रीपेड प्लान! केवळ 398 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग
लाइफफंडा

बीएसएनएलचा जबरदस्त प्रीपेड प्लान! केवळ 398 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने नवीन प्रीपेड प्लान घोषणा केली आहे. ३९८ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेटा बेनिफिट ऑफर दिली आहे. म्हणजेच बीएसएनएलच्या ग्राहकांना आय आता विना FUP लिमिटमध्ये अनलिमिटेड डाउनलोड आणि अपलोड तसेच व्हाइस कॉलिंग मिळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३९८ रुपयांचा बीएसएनएल वाउचर
केरळ टेलिकॉमच्या एका रिपोर्टनुसार, ३९८ रुपयांचा प्रीपेड वाउचर मध्ये ३० दिवसांच्या वैधातेसह ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस कॉलिंग मिनिट्स मिळतात. तसेच पॅकचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ३० दिवसांपर्यंत एफयूपी लिमिटची चिंता नाही. युजर्स अनलिमिटेड डाउनलोड्स आणि अपलोड्स करू शकतील.

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानमध्ये प्रीमियम नंबर्स, इंटरनॅशनल नंबर्स, इन नंबर्सवर आउटगोइंग कॉल किंवा एसएमएस साठी स्टँडर्ड चार्ज द्यावा लागणार आहे. व्हाइस कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स शिवाय युजर्स रोज १०० एसएमएस फ्री पाठवू शकतात. रोमिंग आणि दिल्ली व मुंबई MTNL नेटवर्कवर सुद्धा अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स मिळणार आहे.
३९८ रुपयांचा वाउचरचा फायदा बीएसएनएल युजर्स १० जानेवारी २०२१ पासून खरेदी करू शकतील.

हा प्लान देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये रिचार्जसाठी उपलब्ध आहे. बीएसएनएल आता ३ जी वरून ४ जीवर शिफ्ट होत आहे. तर दुसऱ्या टेलिकॉम कंपन्या ४ जी सर्विस ऑफर करतात. म्हणजेच बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस कॉलिंग थोड्या स्पीडने कमी मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी बीएसएनएलने आपल्या 1,999 रुपयांच्या लोकप्रिय प्रीपेड योजनेत मोठा बदल केला. अहवालानुसार आता कंपनीला 1,999 रुपयांच्या योजनेत विस्तारित इरोस नाऊ मिळणार आहे. त्याचबरोबर कंपनीने लोकधुन सबस्क्रिप्शनची वैधता कमी केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने आपल्या उर्वरित वैशिष्ट्यांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. या व्यतिरिक्त, हे पॅक भारतात सर्व ऑपरेटिंग सर्कलसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.