उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी महाराष्ट्र

उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, उद्योग क्षेत्रात पुरूषांसोबतच महिला उद्योजकांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकही औद्योगिक क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सवलती जाहीर केल्यामुळे उद्योगक्षेत्राची भरभराट होतांना दिसत आहे. नाशिकला उद्योगवाढीस भरपूर वाव असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी भविष्यात निर्माण होणार आहेत.  महाराष्ट्रहेदेशाचेग्रोथइंजिनआहे. उद्योगक्षेत्राच्यावाढीसाठीइन्फ्रास्ट्रक्चरमहत्वाचेआहे.

राज्य शासन उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी पूर्णपणे सकारात्मक आहे. राज्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या काही सूचना असल्यास त्‍या आपण शासनाकडे पाठवाव्यात. या सूचनांची शासनस्तरावर दखल घेण्यात येईल. उद्योजकांना पूर्णपणे संरक्षित केले पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी योवळी सांगितले.