देशात गेल्या ५ महिन्यांतील निच्चांकी रुग्णसंख्येची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात गेल्या ५ महिन्यांतील निच्चांकी रुग्णसंख्येची नोंद

नवी दिल्ली : देशात पाच महिन्यांनंतर, सर्वात कमी कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २५ हजार १६६ नवीन कोरोनबाधितांची नोंद झाली आहे. तर ४३७ कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी १५ मार्च रोजी २४ हजार ४९२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६ हजार ८३० लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी २२ लाख ५० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३२ हजार ७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ४८ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे. एकूण ३ लाख ६९ हजार रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत.

दरम्यान राज्यात आणखी दहा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्य़ातून १०० नमुने जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठविले जात आहेत. यातून डेल्टा प्लसबाधित रुग्णांचे निदान केले जाते. राज्यात यापूर्वी ६६ रुग्ण डेल्टाप्लस बाधित आढळले होते. सोमवारी आणखी दहा रुग्ण आढळले आहेत. तत्पूर्वी, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ ऑगस्टपर्यंत देशभरात कोरोना लसीचे ५५ कोटी ४७ लाख ३० हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ८८.१३ लाख लसी देण्यात आल्या. आतापर्यंत ४९ कोटी ६६ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी सुमारे १५.६३ लाख चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.