राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ; तर १७० मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ; तर १७० मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाली असून मागील २४ तासांच्या तुलनेत आज (ता. १४) दिवसभरात राज्यात नोंद झालेल्या नव्या रुग्णांचा आकडा जवळपास १ हजारांनी वाढला आहे. मंगळवारी राज्यात ७ हजार २४३ रुग्ण सापडले होते. आज हा आकडा ८ हजार ६०२ पर्यंत गेला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा आकडा ६१ लाख ८१ हजार २४७ इतका झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकीकडे नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असताना दिवसभरात नोंद झालेल्या मृतांचा आकडा काहीसा खाली आला आहे. मंगळवारी राज्यात १९६ मृत्यूंची नोंद झाली होती. तो आकडा खाली येऊन आज दिवसभरात १७० मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण मृतांचा आकडा १ लाख २६ हजार ३९० इतका झाला आहे. तर राज्याचा मृत्यूदर अजूनही २ टक्क्यांच्या वरच आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्क्यांवर
गेल्या २४ तासांचा विचार करता राज्यात ६ हजार ०६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५९ लाख ४४ हजार ८०१ इतका झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. आजघडीला राज्यात १ लाख ६ हजार ७६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.