बातमी मुंबई

मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; ३ तासात संपवून टाकण्याची धमकी

मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने ३ तासात कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी आज सकाळी देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिसले होते. त्यांचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीचे कॉल आले. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या फोन नंबरवर ४ ते ५ वेळा धमकी देणारा फोन आला होता. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने डीबी मार्ग पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असावी. पोलिस लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल करू शकते.