राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट
बातमी

राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट

मुंबई : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. (Maharashtra rain update) विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे महापुराची परिस्थीती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने 108 गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार कोकणा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत imd कडून orange alert देण्यात आला आहे. मुंबई पुण्यात पावसाचा जोर ओसरला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने कोकण व विदर्भात आगामी चार दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील उर्वरित भागात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या भागातही 19 ते 22 जुलैपर्यंत पाऊस राहणार आहे. पावसाचा जोर कमी असला तरी संततधार पाऊस असण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.