चला लागा अभ्यासाला! एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

चला लागा अभ्यासाला! एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१चे आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च २०२१ रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्याम सेवा अरजितपत्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ११ एप्रिल रोजी होणार आयोजित करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाच्या परिस्थिती च्या अनुषंगाने सरकारकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाचा अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसंच याबाबतची माहिती आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी नियमित वेबसाईटवर भेट देणं उचित ठरले, असं आयोगाने आपल्या प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, 2020 मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलं आहे. एमपीएससीने याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये आयोजित परीक्षांचं सुधारित वेळापत्रक 7 सप्टेंबर 2020 च्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही रविवार दिनांक ११ ऑक्टोबर, २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. परंतु सरकारने या परीक्षेसोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षाही पुढे ढकलल्याचं प्रसिद्धीपत्रक 13 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता.

तथापि, आता एमपीएससी’ने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. यामध्ये मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जाईल.