राज्यातून दिलासादायक आकडेवारी; दिवसभरात ५९ हजार ३१८ रूग्ण कोरोनामुक्त
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातून दिलासादायक आकडेवारी; दिवसभरात ५९ हजार ३१८ रूग्ण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यात आता रोजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजची आकडे दिलासादायक असून दिवसभरात राज्यात ५९ हजार ३१८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ३४ हजार ३८९ नवीन कोरोनोबाधित आढळले आहेत. तर, ९७४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८१ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३कोटी ११ लाख ०३ हजार ९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३ लाख ७८ हजार ४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ लाख ९१ हजार ९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८ हजार ३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४ लाख ६८ हजार १०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.