नव्या रुग्णांचा आकडा १० हजारांच्या खाली; दिवसभरात १९७मृत्यूंची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा १० हजारांच्या खाली; दिवसभरात १९७मृत्यूंची नोंद

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ ही १०हजारांच्या खाली आली आहे. आज (ता. २४) दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा राज्यातला आकडा ५७ लाख ६२ हजार ६६१ इतका झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.९३ टक्के इतका झाला आहे.

मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात आज दिवसभरात ७८९ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख २४ हजार ११३ झाला आहे. मात्र, त्याचवेळी मुबईत आज दिवसभरात ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा ६ लाख ९१ हजार ६७० इतका आहे.