दिलासादायक ! राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्ग कमी झालेला नाही आणि धोकाही टळलेला नाही. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र दिलासादायक असून रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. सध्या राज्यात ९४.८७ टक्के रिकव्हरी रेट झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज दिवसभरात राज्यात ३ हजार १६० कोरोनाबाधित आढळले, तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत राज्यात २ हजार ८२८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे.

सध्या राज्यात ४९ हजार ६७ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १८ लाख ५० हजार १८९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४९ हजार ७५९ वर पोहचली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३० लाख ६१ हजार ९७६ नमुन्यांपैकी आजपर्यंत १९ लाख ५० हजार १७१ (१४.९३ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ५५७ जण गृह विलगीकरणात आहेत. तर २ हजार ७८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोना लसीकरणा संदर्भात आज एक मोठी माहिती देण्यात आली आहे. लसींना मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होऊ शकते. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.