आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा आराखडा
पुणे बातमी

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा आराखडा

पुणे : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच, शौर्य दिन व अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विजयस्तंभ या स्थळाचा विकास व सुशोभीकरण करण्यासाठी 100 कोटी जाहीर केले होते. तसेच यापुढे शौर्यादिनाचे आयोजन व नियोजन देखील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून शक्य

विजयस्तंभ स्थळाच्या विकासासाठी निधी खेचून आणण्याचे श्रेय अभ्यासू आणि कर्तव्यशील समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना जाते. त्यांचे विविध आंबेडकरी संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. विजयस्तंभ ही एक ऐतिहासिक धरोहर असून लाखो अनुयायांचे प्रेरणा स्थळ आहे. या ऐतिहासिक स्थळाचा विकास व सुशोभीकरण करण्यासंबंधीची संकल्पना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची आहे. त्यासोबतच विजयस्तंभ स्थळाचा विकास व सुशोभीकरणाचा प्रस्तावित आराखडा डॉ.नारनवरे यांनी तयार करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर सादर करून मंजूर करून घेतला.

सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय समिती

एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश

२८ संघटनांसोबत बैठक

नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती घेण्यात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये १ जानेवारी रोजी शौर्यदिनी सर्व अनुयायांना अभिवादन करता येणार, या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना पायाभूत सुविधा पुरविण्याची प्रशासनाची तयारी करण्यात येणार, त्यासोबतच पार्किंग, लाईट, पिण्याचे पाणी, शौचालय, सुचना स्पिकर, स्तंभाची सजावट, मंडप इत्यादी बाबींची पुर्तता सरकार करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तसेच या बैठकीत आंबेडकरी पक्ष संघटनांपैकी तब्बल २८ प्रतिनीधींनी आपली भुमिका मांडली. तसेच आलेल्या सर्व संघटनेच्या प्रतिनिधींचे प्रश्न ऐकून घेत समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासकीय सोयीसाठी लागणारी समिती गठीत करून सर्व सोयी-सुविधा कश्या उपलब्ध होतील याविषयी माहिती दिली.

बुद्धिजीवी आणि तरुणांना आवाहन

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण करण्यासाठी शासनाने १०० कोटी मंजूर केले आहेत. येणाऱ्या काळात याठिकाणी विविध विकासकामे होणार असल्याने समाजातील बुद्धिजीवी आणि तरुणांनी या ऐतिहासिक स्थळाचे महत्व जाणून आपल्याकडे असलेल्या संकल्पना सामाजिक न्याय विभागाकडे कळवावे असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले आहे.