ट्वीटरवर टीवटीव भोवली;  गोएअरच्या पायलटचे तडकाफडकी निलंबन
देश बातमी

ट्वीटरवर टीवटीव भोवली; गोएअरच्या पायलटचे तडकाफडकी निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं तात्काळ पायलटला कामावरून काढून टाकले. मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक ट्विट केल्याप्रकरणी संबंधित पायलटचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती. मात्र मिकी मलिक यांनी आपल्या ट्विटनंतर अनेकांनी या ट्विटवर आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला. वाद वाढत गेल्यावर मलिक यांनी ते ट्विट डिलीट केले. तसेच संबंधित ट्विटसंदर्भात माफी मागितली. “पंतप्रधानांबद्दल आणि इतर काही आक्षेपार्ह ट्विटबद्दल मी माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो. ट्विटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही,” असं सांगत मलिक यांनी माफीही मागितली आहे.

मात्र, या प्रकरणी मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल गोएअरच्या प्रवक्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “गोएअरची अशा प्रकरणात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ती कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. गोएअरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचं, कायद्यांचं आणि सोशल मीडिया संबंधित धोरणांचं पालन करणे बंधनकारक आहे,” असं या प्रवक्त्यांनी म्हंटल आहे.

गोएअरने केलेली ही पहिलीच कारवाई नाही. यापूर्वी जून २०२०मध्येही कंपनीने एका प्रशिक्षणार्थी पायलटची हकालपट्टी केली होती. या पायलटने सीता आणि हिंदू धर्माविषयी वादग्रस्त ट्विट केल्याचा ठपका ठेवत कंपनीने ही कारवाई केली होती.