समाज कल्याण आयुक्त शासकीय वसतीगृहात मुक्कामाला; विद्यार्थ्यांकडून उपक्रमाचे स्वागत
पुणे बातमी

समाज कल्याण आयुक्त शासकीय वसतीगृहात मुक्कामाला; विद्यार्थ्यांकडून उपक्रमाचे स्वागत

पुणे राज्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतीगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, प्रश्न उपस्थित केले जातात, याबाबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम राबविण्यात निर्णय घेतला आहे.. याच संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुक्तांनी थेट

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विद्यार्थ्यांसोबतच दिनांक 27 रोजी येथील गोल्फ क्लब शासकीय वसतीगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांची संवाद साधला आहे. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून राज्यात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या विभागाचा प्रमुख वसतीगृहात रात्रभर मुक्काम करण्याची घटना घडली आहे. या संवाद उपक्रमामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील सुखद धक्का बसला आहे.

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वतः विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सुविधा जेवण व विद्यार्थ्यां मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली. नुसते आयुक्तच नाही तर समाज कल्याण विभागाचे राज्यातील सर्वच उपायुक्त, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात मुक्काम ठोकला आहे. व यापुढेही प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत आयुक्त यांनी ऑनलाइन बैठक घेऊनच दि 27 रोजी त्या संदर्भात निर्देश दिले होते.

संवाद उपक्रमांतर्गत आयुक्त डॉ नारनवरे यांनी येथील वसतिगृहात मुक्काम करून विद्यार्थ्यांबरोबर वेळ घालवला. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मिळणारे जेवण देखील आयुक्त यांनी सोबत केले. आयुक्त यांच्या संकल्पना मुळे विद्यार्थी देखील भारावून गेले. विद्यार्थ्यांना देखील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा यावे आयुक्त यांच्याबरोबर देखील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा यावे आयुक्त यांच्याबरोबर केल्यात.

यावेळी त्यांनी वसतिगृह गृहप्रमुख व गृहपाल यांना वसतीगृहात निवास करणे बाबत सक्त ताकीद दिली. व तक्रारी प्राप्त झाल्यास सक्त कार्यवाही करण्याचे निर्देश यावे दिले. विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच विविध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करणे बाबत देखील निर्देश यावेळी आयुक्त यांनी दिलेत. सदर सवाद कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त यांच्यासमवेत सह आयुक्त भारत केंद्रे, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाद हे उपस्थित होते.