गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड; राज्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त
बातमी महाराष्ट्र

गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड; राज्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त

मुंबई : महाराष्ट्राचे तापमानही गेल्या १० वर्षांत सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. जागतिक हवामान संघटनेने १८५० ते २०२० या कालावधीतील जागतिक तापमानाचा आलेख जाहीर केला आहे. यात सुरुवातीची अनेक वर्षे तापमान सरासरीपेक्षा कमी दिसून येत आहे. मात्र गेल्या साधारण १० ते २० वर्षांत तापमान सरासरीपेक्षा अधिक दिसू लागले आहे. या काळात जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअस वाढ झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्राचा विचार करता प्रामुख्याने १९०१ ते २०२० या कालावधीत तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत परिस्थिती अधिक बिकट बनली असून या काळात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. १९९० नंतर जागतिकीकरणामुळे वातावरणाचे चित्र बदलले. शहरांमध्ये औद्योगिकीकरण वाढले. त्यामुळे शहरांतील हरितपट्टे कमी झालेच; पण गावांकडून शहरांक डे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाल्याने गावाकडील शेती आणि झाडेही कमी झाली. परिणामी, वातावरणाचा समतोल बिघडून तापमान वाढ होत आहे.

प्रत्येकाने आपापल्या प्रदेशाचा आलेख समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून तापमानवाढीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जागतिक हवामान संघटनेने शो युअर स्ट्राइप्स या मोहिमेतून केले आहे.