भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ कोटी पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ कोटी पार

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशात देशातील कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला ०३ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये ०३ लाख ९० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांत ५० हजार ८४८ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १३५८ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. तसेच सलग ४१ दिवस नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्येत १९,३२७ रुग्णांची घट झाली आहे. सोमवारी ४२,६४० कोरोना रुग्ण आढळले होते.

देशात आतापर्यंत ३ कोटी २८ हजार ७०९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्ण उपचाराधीन आहेत. २२ जूनपर्यंत देशात २९ कोटी ४६ लाख नागरिकांना लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्याआधी ५४ लाख २४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. तर आतापर्यंत ३९ कोटी ५९ लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.