सर्वात मोठी बातमी! आसाराम बापूला कोर्टाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
बातमी

सर्वात मोठी बातमी! आसाराम बापूला कोर्टाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

आताची सर्वात मोठी हि बातमी आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला असून आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं अखेर ही शिक्षा सुनावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नेमकं काय आहे आसाराम बापू प्रकरण ?

आसाराम बापूवर उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही तरुणी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आसाराम मठात शिकत होती. मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळील एका मठात बोलावले होते. 15 ऑगस्ट 2013 रोजी तिच्यावर बलात्कार झाला.

आसाराम बापूच्या खटल्याचा इतिहास

– 20 ऑगस्ट 2013 रोजी आसरामवर 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत दिल्लीत खटला दाखल करण्यात आला आणि प्रकरण जोधपूर न्यायालयात वर्ग करण्यात आले.

– 23 ऑगस्ट 2013 रोजी आसारामावर खटला दाखल करण्यात आला होता. मात्र संतप्त आसराम समर्थकांनी कमला मार्केट पोलिस स्टेशनची तोडफोड केली.

– 28 ऑगस्ट 2013 रोजी पीडितेच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली होती. दुसरीकडे आसरामने मुलगी मानसिक आजारी असल्याचा दावा केला आहे.

– 29 ऑगस्ट 2013 रोजी आसरामने अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेत्यांवर जाणीवपूर्वक निशाणा साधल्याचा आरोप केला.

– 31 ऑगस्ट 2013 रोजी आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली होती आणि आसारामला पोलिस कोठडी देण्यात आली होती. मात्र त्याचवेळी समर्थकांनी बाजूलाच गोंधळ घातला.

– नोव्हेंबर 2013 मध्ये जोधपूर पोलिसांनी आसारामवर आरोप लावले. आसराम आणि इतर चौघांवर बलात्काराचा आरोप होता.

– फेब्रुवारी 2014 मध्ये आसारामविरोधात खटला सुरू झाला.

– ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी आसाराम बापूच्या वकिलाचे पत्र घेतले.

– आसाराम बापूला एक विशेष आजार आहे ज्यामुळे त्या महिला आकर्षित होतात असा विचित्र युक्तिवाद कोर्टात झाला.

– फेब्रुवारी 2015 मध्ये आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदार राहुल सचान कोर्टात जबानी देण्यासाठी गेला असता त्याच्यावर हल्ला झाला होता.

– 8 जुलै 2015 रोजी आणखी एक साक्षीदार सुधा पाठक यांनी साक्ष देण्यापासून माघार घेतली आणि आसाराम बापूबद्दल आम्हाला काहीही माहिती नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

– 12 जुलै 2015 रोजी शाहजहांपूरमध्ये साक्षीदार कृपाल सिंहची हत्या करण्यात आली होती.

– 7 एप्रिल 2018 रोजी जोधपूर कोर्टात पक्षकारांमधील वाद संपला. आज 25 एप्रिलला त्याच्या शिक्षेवर कोर्टात सुनावणी झाली.