शेती करणं काही सोपं काम नाही. जमीन नांगरावी लागते, त्यामध्ये बिया पेराव्या लागतात मग योग्य प्रमाणात पाणी आणि खत द्यावं लागतं. त्यानंतर पिक येतं. बरं, जर जास्त पाऊस पडला किंवा कडक उन पडलं तर पिकांचं नुकसान होतं. त्यातूनही चांगलं पिक काढण्यात यश मिळालं तर माकडांची भिती ही असतेच. यावर उपाय म्हणून शेतामध्ये बुजगावणं उभं करतात. […]
Author: Ashish Gaikwad
राज्यात भूकंप? मंत्री राहिल की नाही माहिती नाही… कृषिमंत्री सत्तारांना कशाची कुणकुण लागलीये?
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सध्याचं शिंदे फडणनीस सरकार कोसळणार, असे आरोप दररोज विरोधी पक्ष करतो आहे. तशी शक्यता अनेक नेते बोलून दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. अशा सगळ्या चर्चा सुरु असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या आणि सरकारच्या भवितव्याबाबत मोठे विधान केले आहे. मी किती दिवस कृषिमंत्री […]
उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी
मुंबई, ता. २० : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी […]
डॉ नितीन अंबेकर यांच्या प्रयत्नामुळे नवजात अर्भकास मिळाले जीवदान; नारायणप्रभा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
मुखेड : तालुक्यात मोजकेच अत्याधुनिक सेवा देणारे रुग्णालय आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेकांना गंभीर आजार आणि तात्काळ उपचार मिळवण्यासाठी नांदेडलाच पोहचावे लागते. अश्या अडचणींना तोंड देण्यासाठी मुखेड शहरात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अनुभवी डॉक्टरांची गरज आहे. नुकतेच मुखेड येथील डॉ.नितीन अंबेकर यांच्या नारायणप्रभा रुग्णालयात एका नवजात अर्भकाला जीवदान मिळाले आहे. होनवडज येथील सुमित्रा बिचेवाड यांच्या […]
मोठी बातमी! सदानंद कदमला ईडीची कोठडी; मात्र, ईडीचा ‘तो’ दावा कोर्टाने फेटाळला
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने १५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. चार तासांच्या सतत चौकशीनंतर कदम यांना काल (शुक्रवार, 10 मार्च) ईडीने अटक केली. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे सदानंद कदम यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले. तसेच, ईडीने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये अनिल परब यांच्या खात्यातून विभा साठे यांना […]
उदयनराजेंचा भाजप-राष्ट्रवादी आघाडीवर मोठा गौप्यस्फोट; नागालँडमध्ये म्हटलं तर..
नागालँडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण सरकारला नाही तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत असल्याचे सांगत त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आता खासदार उदयनराजेही प्रतिक्रिया देत आहेत. उदयनराजे नेमके काय म्हणाले? नागालँडमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी […]
H3N2 Influenza: “H3N2” विषाणूच्या प्रसारापासून सावध राहा, केंद्र सरकारने जारी केले नवीन नियम
कोरोनाची लाट संपली आहे आणि आता “H3N2” व्हायरस वाढत आहे. केरळ आणि हरियाणामध्ये दोन मृत्यू झाल्याने केंद्राने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याची शिफारस केली जाते. फेडरल डिपार्टमेंट ऑफ हेल्थने इन्फ्लूएंझा सारख्या आजाराबद्दल राज्ये आणि कॉमनवेल्थ प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात H1N1 आणि H3N2 सारख्या गंभीर तीव्र श्वसन रोगांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे […]
Maharashtra Budget: एसटीने ‘निम्मे भाडे’ जाहीर केल्यानंतर महिला प्रवाशांनी दिल्या प्रतिकिया
Maharashtra Budget: ‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. ‘लाल परी’ ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. लाल परी आज महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचली आहे. ग्रामीण भागातील गरीब प्रवाशांना या बसची मोठी मदत होत आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या कारणास्तव एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटावर ५० टक्के सवलत देण्याचा […]
राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकार कडून मोठं गिफ्ट
राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकार कडून मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. राज्य सरकारने काल विधिमंडळाच्या अधिवेशनात आपला आर्थिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला. त्यात गेल्या आर्थिक वर्षात राज्याचा विकास 9.1 टक्क्यांनी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आगामी काळात राज्यात अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. हा काळ राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा असेल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
‘आम्हाला पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीचे स्वागत आहे’; शिंदे गटाच्या नव्या भूमिकेने चर्चेला आले उधाण
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत गेल्यास त्यांचे स्वागत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राजकीय विश्वात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटांना पाठिंबा देणार का, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. संजय […]