नवऱ्याला सोडू शकते, पण मोबाईलला नाही! वर्षभरातच संसार मोडला, बायकोनं काडीमोड घेतला
देश बातमी

नवऱ्याला सोडू शकते, पण मोबाईलला नाही! वर्षभरातच संसार मोडला, बायकोनं काडीमोड घेतला

लखनऊ: सध्याच्या लाईफस्टाइलमध्ये मोबाईल हा लोकांना त्यांच्या सर्वात जवळचा झाला आहे. या मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध बिघडत आहेत. मोबाईलमुळे एकप्रकारे दुरावा संपला असला तरी जवळच्या नात्यांमधील दुरावा वाढत चालला आहे. मोबाईलमुळे वैवाहिक संबंध बिघडत असल्याच्याही अनेक घटना पुढे येत असतात. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये घडलं आहे. जिथे मोबाईलमुळे वर्षभरातच लग्न तुटले आहे. या जोडप्याला पोलिसांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, महिलेने सांगितले की ती पतीला सोडू शकते, पण मोबाईल नाही. पंचायत झाल्यानंतर दोघे वेगळे झाले आणि एकमेकांचे सामान परत केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बिरनो पोलीस स्टेशन हद्दीतील गजपतपूर येथे राहणारी अनिताचा रमाकांतसोबत १० जून २०२१ ला विवाह झाला होता. रमाकांत हा गुजरातमध्ये खासगी नोकरी करतो. पंधरा दिवसांपूर्वी रमाकांत घरी आला असता अनिताही तिच्या माहेरून सासरी परतली होती. ती नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असायची. कधी ती कोणाशी तरी बोलत राहायची, तर तर कधी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर व्यस्त असायची.

पत्नीचा मारहाणीचा आरोप

मोबाईलवरुन दोघांमध्ये भांडण झाले. बुधवारी अनिताने कासीमाबाद पोलीस ठाणे गाठले आणि पतीवर मारहाणीचा आरोप केला. पोलिसांनी पतीला पोलीस ठाण्यात बोलावले. दोघांच्या नातेवाईकांनीही पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी विवाहितेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, काही निष्पन्न झाले नाही. तिने स्पष्टपणे सांगितले की ती तिच्या पतीला सोडू शकते, परंतु मोबाईल नाही. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण पंचायतीकडे सोपवले. तासभर चाललेल्या पंचायतीनंतर दोघे वेगळे झाले आणि एकमेकांचे सामान परत केले. रमाकांत आणि अनिता यांचा प्रेमविवाह झाला होता.