देशात काल विक्रमी लसीकरणाची नोंद; नव्या रुग्णांचा मात्र आकडा कमी होईना
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात काल विक्रमी लसीकरणाची नोंद; नव्या रुग्णांचा मात्र आकडा कमी होईना

नवी दिल्ली : देशभरात काल विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात अडीच कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, देशातील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. काल ३४ हजार ४०३ रुग्ण आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ६६२ कोरोनाबाधित आढळले असून ३३ हजार ७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २८१ जणांच्या मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात सध्या ३ लाख ४० हजार ६३९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात नव्या बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३४ लाख १७ हजार ३९० झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६५ टक्क्यांवर आहे. तसेच आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ बाधितांनी करोनातून बरे झाले आहेत. देशभरात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४४ हजार ५२९ जणांना जीव गमवावा लागला आहे.

देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ८५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटिव्हीटी रेट २.४६ टक्क्यांवर असून हा दर १९ दिवसांपासून तीन टक्क्यांच्या खाली आहे.