मोठी बातमी : उन्नाव बलात्कार प्रकरणातील भाजपकडून निवडणुकीचं तिकीट
राजकारण

मोठी बातमी : उन्नाव बलात्कार प्रकरणातील भाजपकडून निवडणुकीचं तिकीट

लखनौ : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. संगीता सेनगर भाजपच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गतवर्षी भाजपने पक्षातून बडतर्फ केलेले कुलदीप सेनगर यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने सेनगर यांना दोषी ठरवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसंच १० लाखांचा दंडही ठोठावला होता. यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा कुलदीप सेनगर यांचा दावा आहे. दरम्यान २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कुलदीप सेनगर हे भाजप आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.