कोरोना लसीच्या तुटवड्यावर उदयनराजेंचं वादग्रस्त विधान
राजकारण

कोरोना लसीच्या तुटवड्यावर उदयनराजेंचं वादग्रस्त विधान

सातारा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत लसीचे डोस संपल्याने लसीकरण थांबविण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. याबाबत राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात कोरोना लसचे नियोजन होऊ शकले नाही यामागचं कारण हे फॅमिली प्लॅनिंग न केल्यामुळे झाले असल्याचे अजब मत उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांना कोणत्यातरी कार्यकर्त्याने साताऱ्याची नगरपालिका महानगरपालिका करण्याचे सुचवले होते. त्या गोष्टीची आठवण करुन देत जिल्ह्याची लोकसंख्या काय मी वाढवायची का, असा टोला त्या कार्यकर्त्याला हाणल्याचे ही उदयनराजे सांगायला विसरले नाहीत.

आजपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एकूण 446 कोरोना लसीकरण केंद्रे आहे आता डोसच शिल्लक नसल्याने सर्व केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.