रामदास आठवले यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका
राजकारण

रामदास आठवले यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

नवी दिल्ली : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा लोकशाहीचा अवमान केला आहे. लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपवणे आवश्यक होते. ट्रम्प यांनी मात्र याउलट कृती करून सतःची प्रतिमा कलंकित करून घेतली आहे. अशा शब्दांत आठवले यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आम्हाला आदर होता, मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य न करता पदाला चिकटून राहण्याची केलेली कृती लोकशाहीविरोधी आणि रिपब्लिकन प्रतिमेला काळिमा फासणारी आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांचा विजय झाला. मात्र, त्यांच्या विजयाला संमती देण्यात आडकाठी आणायचे हीन कृत्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.