पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा आफ्रिकेवर दणदणीत विजय
क्रीडा

पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

नवी दिल्ली : पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पदार्पणवीर नौमान अली (५/३५) आणि यासिर शाह (४/७९) या फिरकीपटूंनी दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात गडी राखून धूळ चारली. आफ्रिकेने दिलेले ८८ धावांचे माफक लक्ष्य पाकिस्तानने चौथ्या दिवशीच गाठले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३४ वर्षीय डावखुरा फिरकीपटू नौमान आणि यासिर यांच्यापुढे आफ्रिकेचा दुसरा डाव २४५ धावांत आटोपला. सलामीवीर एडीन मार्करम (७४) आणि ऱ्हासी व्हॅन डर दुसेन (६४) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १२७ धावांची भागीदारी रचूनही आफ्रिकेचा डाव १ बाद १७५ धावांवरून ६ बाद १९२ असा कोसळला.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम (३०) आणि अझर अली (नाबाद ३१) यांनी पाकिस्तानसाठी मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात शतक साकारणारा फवाद आलम सामनावीर ठरला. मालिकेतील दुसरी कसोटी ४ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे.