कोहलीचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज
क्रीडा

कोहलीचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज

पुणे : इंग्लविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक खास यादीत स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १० हजार धावांचा टप्पा पार केला. या क्रमांकावर फलंदाजीला येत १० हजार धावा करणारा तो क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने क्रमांक तीनवर येत अशी कामगिरी केली होती.

पॉन्टिंगने वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १२ हजार ६६२ धावा केल्या आहे. याबाबत विराटने कुमार संगकारा, जॅक कॉलिस, केन विलियम्सन यांना मागे टाकले. संगकाराने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत २३८ डावात ९ हजार ७४७ धावा केल्या. कॅलिसने २०० डावात ७ हजार ७७४ तर विलियम्सनने ११७ डावात ५ हजार ४२१ धावा केल्या आहेत कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर सर्वात वेगाने १० हजार धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. गेल्या एकदिवसीय सामन्यात विराटने भारतीय मैदानावर सर्वात कमी डावात १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. विराटने २१९ डावात हा टप्पा पार केला.