तर मीराबाई चानूला मिळणार गोल्ड मेडल!
क्रीडा

तर मीराबाई चानूला मिळणार गोल्ड मेडल!

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला कदाचित सुवर्णपदक मिळण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये तिच्या गटात सर्वोच्च गुण मिळवून सुवर्णपदक मिळवणाऱ्या चीनच्या होऊ झिहुई हिची Anti-doping authorities कडून चाचणी होणार आहे. या चाचणीत झिहुई हिने उत्तेजक घेतल्याचं आढळलं तर दुसऱ्या क्रमांकावरच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक बहाल केलं जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वेटलिफ्टर मीराबाई चानूनं टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या मीराबाईकडून यंदा संपूर्ण देशाला मोठी अपेक्षा होती. मीराबाईनं 202 किलो वजन उचलत ही अपेक्षा पूर्ण केली. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच मेडल मिळालं आहे.

वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील भारताचं हे दुसरं ऑलिम्पिक मेडल आहे. यापूर्वी करनाम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिम्पिकमध्ये (2000) ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. मीराबाईनं यंदा सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. तिने स्नॅच गटात 87 तर क्लीन एंड जर्क गटात 115 असे एकूण 202 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टर हाऊ झिहूनं एकूण 210 किलो वजन उचलत गोल्ड मेडल पटकावलं.